Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा : ABP Majha


ऐन एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.. आता एप्रिल संपत आला तरी अवकाळी मात्र जायचं नाव घेत नाही आहे..हवामान विभागानं आज महाराष्ट्रात पुढील ५ दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिलाय.. तर मराठवाड्यासह विदर्भाला ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिलाय... सोबतच मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलायं.. एवढंच नाही तर २ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं चांगलीच बॅटींग केलेय. ज्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झालाय.. यवतमाळ, परभणी, हिंगोली, वाशिमध्ये गारांचा पाऊस झाला.. ज्यामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झालंय..आठवड्याभरापासून  सातत्याने  सुरु असलेल्या  अवकाळी  आणि वादळी वाऱ्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola