Maharashtra Monsoon : राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार, काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून आले होते. या ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला होता. विशेषतः शनिवारी काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या होत्या. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. या काळात अचानक वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता असल्याने प्रवासात आणि घराबाहेर पडताना खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.