Maharashtra Weather :विदर्भाच्या पुढच्या पाच दिवसात पारा वाढणार, 40अंशावर तापमान जाण्याची शक्यता
Continues below advertisement
विदर्भात गेल्या दहा वर्षात एप्रिल महिना सर्वात थंड महिना म्हणून नोंदवला गेलाय. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे विदर्भात तापमानात वाढच झाली नाहीये. एप्रिल महिन्यातले जर दोन दिवस जर सोडले तर नागपुरात पारा चाळीशी पार जाऊच शकला नाही.. अस जरी असलं तरी हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे आजपासून खऱ्या अर्थाने तापमान वाढीला सुरुवात होणारेय. त्यामुळे सध्या 35 च्या घरात असलेलं तापमान लवकरच 42 ते 43 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. ... त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसांत उन्हाळा चांगलाच जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात येतोय.
Continues below advertisement