Maharashtra Water Shortage : राज्यात पाणीटंचाई, पाण्याचा वापर काटकसरीनं वापर करण्याच्या सुचना
आता बातमी आहे राज्यात ओढ दिलेल्या पावसासंदर्भातली... राज्यात सर्वत्र पावसानं ओढ दिलीय. त्यामुळे बऱ्याच भागांत आता पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलंय. स्थानिक परिस्थितीनुसार धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. तसंच जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून पैसे द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.