Ballot Paper | महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय उपलब्ध होणार
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभेचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या आहेत. त्या दृष्टीने महाराष्ट्र विधानमंडळाने कायदा करावा अशा प्रकारच्या सूचनाही अध्यक्षांनी दिल्या आहेत.
नागपुरच्या प्रदिप महादेवराव उके यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे निवेदन तसेच याचिका सादर केली होती. त्यासंदर्भात मंगळवारी विधानभवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव उपस्थित होते.