Raj Thackeray Speech : तीन सत्ताधारी आमदारांनी केलेल्या भाषणाचं 'लाव रे तो व्हिडीओ'

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), सतीश चव्हाण (Satish Chavan) आणि मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनीच मतदार याद्यांमधील (Voter Lists) गोंधळावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘निवडणूक आयोग म्हणतं नाव काढू नका, अरे हे जी डबल नावं आहे तुम्ही का काढत नाही?’ असा थेट सवाल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात लाखापेक्षा जास्त बोगस मतदार असल्याचा दावा केला आहे. तर, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर मतदारसंघात छत्तीस हजार नावे दुबार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तर अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करत असल्याचा गंभीर आरोप करत, आपण अनेक वर्षांपासून हा मुद्दा मांडत असल्याचे सांगितले. सत्ताधारी आमदारांच्या या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola