Voter List: मतदार याद्या अपडेट करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्याची मागणी
Continues below advertisement
राज्य निवडणूक आयोग (State Election Commission), केंद्रीय निवडणूक आयोग (ECI), महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांच्यात मतदार याद्या अद्ययावत करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'पंधरा ऑक्टोबरपर्यंत नव्या मतदारांची नोंदणी करू द्या आणि दुबार नावं वगळू द्या,' अशी स्पष्ट मागणी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावे असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुबार नावे वगळण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दोन आठवडे उलटूनही राज्य निवडणूक आयोगाच्या पत्राला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement