Uddhav Thackerya On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना पप्पू बोलण्याचं धा़डस आशिष शेलारांनी दाखवलं

Continues below advertisement
बनावट मतदारयादीच्या (Bogus Voters) मुद्द्यावरून आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातच वाद उफाळून आल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. 'आशिष शेलारनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेला आहे,' असा खोचक टोला या प्रतिक्रियेत लगावण्यात आला आहे. शेलार यांनी लोकसभा निवडणुकीपासून मतदारयादीत गोंधळ असल्याचे मान्य केल्यामुळे त्यांनी स्वतःच्याच नेत्यांवर, अगदी मोदी-शहांवरही (Modi-Shah) आरोप केले आहेत, असेही म्हटले आहे. शेलार यांनी फक्त हिंदू-दलित दुबार मतदार दाखवले, पण मुस्लिम दुबार मतदारांबद्दल ते का बोलत नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आम्ही संपूर्ण मतदारयादी सदोष असल्याची मागणी करत आहोत आणि त्यात सुधारणा होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, या मागणीचाही पुनरुच्चार करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola