Raj Thackeray Satyacha Morcha: अन् राज ठाकरेंनी दुबार मतदारांची यादीच वाचून दाखवली, पुरावे सादर
Continues below advertisement
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) लाखो दुबार नावे असल्याचा गंभीर आरोप होत असून, Mumbai, Thane, Pune आणि Nashik सारख्या प्रमुख शहरांमधील याद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘मी वीस हजार मतं बाहेरून आतमध्ये आणली आहेत,’ अशी धक्कादायक कबुली पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांनी एका जाहीर सभेत दिली. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मुंबईतील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये हजारो दुबार मतदार असल्याची आकडेवारी समोर मांडण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात २.९ लाख, तर मावळ लोकसभा मतदारसंघात १.४५ लाख दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गोंधळामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत असून, लोकशाहीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement