Maharashtra Vidhansabha : अध्यक्षपदाची निवडणूक आणि राजकारण, भाजप उमेदवार देणार?
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा नियमात बदल करण्यात आला आहे. मात्र, ही निवडणूक गुप्त मतदानाने व्हावी अशी भाजपची मागणी आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News