maharashtra,vidhan sabha adhiveshan 2021: सरकारच्या पत्राला राज्यापालांकडून अजूनही उत्तर नाही

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होईपर्यंत राज्यपालांकडून निवडणुकीबाबत कोणतीच प्रतिसाद आलेला नाही. आजच्या कार्यक्रम पत्रिकेत अध्यक्ष निवडीबाबत कोणताच उल्लेख नाही. त्यामुळे आघाडी सरकारनं अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा सुरु झालीय. पण सत्ताधारी तीनही पक्षांनी त्यांच्या आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्यानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. आघाडीची रणनीती नेमकी काय आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडतात का याकडे लक्ष लागलंय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola