Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेचं गणित काय? मतांचा कोटा, कुणाला घाटा?
विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा २३ इतका आहे.. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे ८ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून येऊ शकतात.. एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे... तरीही महाविकास आघाडी तिन्ही जागा लढण्यावर ठाम आहे.. कुणीही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत झालाय... तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआकडून मतांची जुळवाजुळव सुरु झालीय.. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा मविआकडून करण्यात आलाय..
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत...
भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल झाला...
शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज दाखल झाला..
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज भरला..
महाविकास आघाडीकडून ३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज भरलाय..