Maharashtra Vegetable Rate : टोमॅटो, वांगीसह अनेक भाजीपाल्याचे दर गगनाला : Abp Majha
Continues below advertisement
अवकाळी पावसाचा फटका भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणावर बसल्याने आवक कमी झालीय आणि याचा परिणाम म्हणून टोमॅटो, वांगीसह अनेक भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. खास करून टोमॅटोचा विचार केला तर किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोचे भाव 60 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचले आहेत मात्र एकीकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे काबाडकष्ट करून टोमॅटोचे पिक घेणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच मिळत नसल्याने तो हवालदिल झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे अवकाळी पावसानंतर टोमॅटो पिकाला फळमाशीचा मोठा फटका बसत असल्याने टोमॅटो खराब होत असून व्यापारी माल विकत घेईल का ? आणि घेतला तरी योग्य भाव मिळेल का ? असे अनेक प्रश्न सध्या टोमॅटो उत्पादकांसमोर उभे राहिले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र शेतकरी Farmers ताज्या बातम्या Tomato ताज्या बातम्या Abp Maza Live Brinjal महाराष्ट्र शेतकरी Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv वांगी Vegetable Prices