Vegetable Loss : गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, आवक कमी झाल्यानं दरात वाढ

Continues below advertisement

Maharashtra vegetable Loss : गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम, आवक कमी झाल्यानं दरात वाढ 
गारपिटीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाज्यांचे नुकसान झाल्यामुळे आवक कमी झाली आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधी भोपळा, फ्लॉवर, मिरचीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये काल राज्याच्या विविध भागांतून आणि परराज्यातून ६५५ वाहनांमधून ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली. दुधी भोपळ्याचे दर किलोमागे ११ ते १५ वरुन २८ ते ४० वर पोहोचले आहेत. फ्लॉवरचा दर ८ ते १० वरुन १० ते १४ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय हिरव्या मिरचीसह पालेभाजांचे दरही वधारले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram