Maharashtra Unseasonal Rain Loss : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीवरुन विरोधकांचा सभात्याग

Continues below advertisement

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी करमचाऱ्यांनी पुकारेल्या संपाचा मोठा फटका मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसतोय. कारण जेवढं नुकसान झालंय, त्याच्या केवळ दोन टक्के पंचनामे झाल्याचं समोर आलंय.  मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले असून, आतापर्यंत फक्त 1 हजार 384 हेक्टरचे पंचनामे झाले आहे. महसूल विभागातील कर्मचारीही संपावर असल्याने पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे संपातून निदान शेतकऱ्यांना तरी वगळा आणि तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा, अशी आर्त हाक शेतकरी देतोय.. कांदा आणि कापसाला आधीच भाव नाही.. त्यात अवकाळीमुळे उभी पिकं आडवी झाली.. आणि हे सर्व कमी म्हणून की काय तर संपामुळे पंचनामेही होत नाहीयेत.. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला... नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली.. दरम्यान याच मागणीसाठी विरोधकांनी सभात्यागही केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram