Maharashtra Unlock : Hotel, Restaurants ला रात्री 10 पर्यंत मुभा मिळणार? : ABP Majha
लशीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लोकलचं स्वातंत्र्य दिलंय. त्यासाठी आजपासून लोकलचा पास मिळतोय. मुंबईत दुकानांनाही रात्री १० पर्यंतची परवानगी देण्यात आलीय. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना रात्री १० पर्यंत मुभा मिळण्याचे संकेत मिळतायत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. या बैठकीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना वेळ वाढवून देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दुपारी ४ पर्यंतची परवानगी आहे.