Maharashtra winter session :आजपासून नागपूरऐवजी मुंबईत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन : Abp Majha
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीमुळे कमालीचा गारवा आला असला तरी आजपासून मुंबईत वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण आजपासून मुंबईत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होतंय. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतंय. पेपरफुटी प्रकरण, ओबीसी राजकीय आरक्षण, एसटी संपासह विविध मुद्द्यांवरुन हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार यात शंका नाही. याशिवाय वीजबिल, लॉकडाऊन, महिला सुरक्षा आणि अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचं नुकसान या मुद्द्यांवरुन रणकंदन होण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई महाराष्ट्र Winter Session विधानसभा ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron मुंबई महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv विधानसभा