Maharashtra Rain : राज्यात तब्बल 20जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Continues below advertisement
यंदाच्या मोसमात पावसानं रौद्र रुप दाखवलं आणि अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आणि आता जाता जाता देखील पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू उभे केलेत. परतीच्या पावसानं बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोलीसह राज्यातल्या अनेत ठिकाणी उभ्या पीकाचं नुकसान केलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं, आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलं आहे. हिंगोलीत कयाधू नदीला पूर आलं आहे. बुलढाण्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या पीकाचं मोठं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement
Tags :
Yellow Alert Nashik Yavatmal Akola Gadchiroli Jalgaon Nagpur Dhule Beed Wardha Amravati Nandurbar Bhandara Washim Jalna Parbhani Nanded Rainfall Hingoli Gondiya Maharshtra