Political Row : ‘बालनाट्य स्पर्धा हायजॅक करण्याचा प्रयत्न’, मंत्री Uday Samant यांच्या पत्नीच्या संस्थेवर NCP चे गंभीर आरोप

Continues below advertisement
महाराष्ट्र शासनाच्या बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांवरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बालरंगभूमी परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत. 'बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेकडून शासनाच्या स्पर्धा 'हायजॅक' केल्या जात असून हे सर्व राजकीय दबावाखाली होत आहे,' असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. यंदा शासनाने कोणतीही अधिकृत घोषणा न करता, २१ वर्षांपासून सरकारी नियंत्रणात होणाऱ्या या स्पर्धा खासगी संस्थेमार्फत राबवण्याचा निर्णय घेतल्याने हे स्पर्धेचे खासगीकरण आहे आणि यात पारदर्शकतेचा अभाव आहे, असा दावाही करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola