Heat Stroke Maharashtra Special Report : राज्याला तापमान वाढीचा धोका, काय काळजी घ्यावी?

Continues below advertisement

Heat Stroke News: नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघरमध्ये (Kharghar) रविवारी (16 मार्च) आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे (Heat Stroke) 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. तर 15 श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री रुग्णांची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. रविवारी एकूण 300 श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातील अनेकांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलं. मात्र 32 जणांची प्रकृती गंभीर होती, त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram