Maharashtra Temperature : राज्यभरात पाऱ्याचा खेळ, अनेक ठिकाणी तापमानाची घसरण
आतापर्यंत अवकाळी पावसाळ्याबद्दल आपण ऐकलं होतं.. मात्र आता अवकाळी उन्हाळा आणि हिवाळा देखील अनुभवायला मिळतोय.. थंडीचा मोसम सुरु होऊन काही दिवसही लोटले नव्हते तोच पाऱा पस्तीशीवर जाऊन पोहोचला... आणि दोन दिवसांपासून पाऱ्याची पुन्हा घसरण सुरु झाली आहे.. आणि अनेक जिल्ह्यांत पारा 10 अंशापर्यंत आलाय... अशा हवामानाचा पिकांना तर फटका बसतोच आहे.. मात्र लोकांचं प्रकृती देखील बिघडू लागली आहे... अनेकांना सर्दी, खोकला आणि तापानं बेजार केलंय.