Maharashtra Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक भरती जुलै-ऑगस्टमध्ये होणार

Continues below advertisement

यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली, त्यानंतर 24 मार्च रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास अडीच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र परीक्षा झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक भरती नेमकी कधी होणार ? याची प्रतीक्षा या उमेदवारांना होती. आता ही शिक्षक भरती 15 मे नंतर संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलीय. त्यासाठी लवकरच शिक्षक भरतीसाठी असलेले पवित्र पोर्टल हे ऍक्टिव्ह करण्यात येणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram