Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

Continues below advertisement

भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप...तावडेंसह उमेदवार राजन नाईंकांविरोधात गुन्हा दाखल.................
कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे नियम समजावण्यासाठी आलो होतो, पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंची प्रतिक्रिया...तर ६ तासांनंतर विनोद तावडे मुंबईच्या दिशेनं रवाना
विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन येत असल्याचं भाजपवाल्यांनीच सांगितलं, हितेंद्र ठाकूर यांचा दावा...निवडणूक आयोग, पोलिसांनी कारवाई करण्याचीही मागणी
तावडे जड होतील म्हणून भाजपमध्येच कारस्थान, संजय राऊतांचा आरोप...गृहखातं तावडेंवर पाळत ठेवून होतं, राऊतांचा दावा...
तावडेंसोबत सापडल्या चार डायऱ्या...डायरीत रॅलीतल्या लोकांची नावं आणि आकडे...त्या लाखोंच्या रकमा, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप...
आमदार विकत घेतले आता मतदार विकत घेताय का, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल...नोटाबंदी करूनही एवढी रोकड येते कुठून, विचारला सवाल...

डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का.. मतदानाच्या पूर्व संध्येला डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजप प्रवेश
पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर बारामतीत युगेंद्र पवारांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाचं सर्च ऑपरेशन... तपासणीत काहीही आढळलं नसल्याची अधिकाऱ्यांची माहिती...
सख्खा भाऊ भाजपसोबत गेल्यानेच युगेंद्रच्या शरयु मोटर्समध्ये तपासणी, श्रीनिवास पवारांचा आरोप
काँग्रेसच्या तक्रारीनंतर शिवसेना शिंदे गटाला २४ तासांत म्हणणं मांडण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश, टीव्ही मालिकांमधील छुपा प्रचार शिंदे गटाच्या अंगलट... 
प्रचाराची सांगता झाल्यावर उद्धव ठाकरे तुळजाभवानीच्या चरणी, पत्नी रश्मी ठाकरेंसह पूजा, तुळजाभवानीला साडी-चोळी अर्पण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram