Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 19 July

Continues below advertisement

युपीएससीच्या तक्रारीनंतर पूजा खेडकरांविरोधात दिल्लीत गुन्हा, निवड रद्द का करु नये आणि पुढच्या परीक्षांना बंदी का घालू नये अशी यूपीएससी कारणे दाखवा नोटीस...

पूजा खेडकर ७२ तासांनंतर वाशिमच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर, पूजा खेडकर संभाजीनगरकडे रवाना झाल्याची माहिती

पूजा खेडकरांचं बनावट रेशनकार्ड 'माझा'च्या हाती, बोगस रेशनकार्डच्या आधारे बोगस अपंगत्व प्रमाणपत्र मिळवलं

भाजपा आता रोज सकाळ-संध्याकाळ प्रतिक्रिया देणार,सकाळी ९ वाजता आणि दुपारी ४ वाजता बोलण्यासाठी १० बड्या नेत्यांची टीम जाहीर, विभागवार बोलायलाही २० जणांची टीम..

विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग केलेल्या काँग्रेसच्या सात आमदारांच्या निलंबनाची शक्यता, कारवाईचा निर्णय दिल्लीतून होणार 

विधानसभेला काँग्रेस मविआत सर्वाधिक जागांवर दावा करणार, काँग्रेसच्या बैठकीत चर्चा, आज संध्याकाळी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक 

मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा, स्पाइसजेट, अकासाची विमानसेवा बाधित तर इंडिगोची २०० विमानं रद्द

उद्या सकाळी १० पासून कठोर आमरण उपोषण सुरु करणार, मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारने मागण्या मान्य कराव्या, जरांगेंची मागणी.

शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, ट्रम्पेट चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवल्याचा पवार गटाचा दावा..

समाजवादी पक्षाच्या खासदारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन तर चैत्यभूमीलाही दिली भेट... विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवता समाजवादी पार्टीच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व..

विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल..

लंडनहून आलेल्या वाघनखांचं साताऱ्यात अनावरण, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा.. उद्यापासून पाहता येणार वाघनखं 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram