Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 08 PM : 27 May 2024

Continues below advertisement

पुण्यातील कल्याणी नगर कार अपघात प्रकरणात ससूनचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप, दोघांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी, तर स्विफ्ट कारमधून तीन लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील अटक

पुणे पोलिसांना मिळाली विशाल अगरवालची पोलीस कोठडी, ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल. 

आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीवरुन डॉ.अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती,  २६ डिसेंबर २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिल्याचं समोर. 

 पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अगरवाल कुटुंबाच्या विरोधात तिसरी तक्रार दाखल, वडगाव शेरी भागातील टिंगरे आणि विशाल अगरवालने १० एकर जमीन बळकावल्याचा महिलेचा आरोप.

पोर्शे कार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधींकडून गा़डीची तपासणी, पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी, पुणे आर टी ओ अधिकाऱ्यांचीही उपसस्थिती. 

पुणे रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा पोलिसांना सवाल. 

अजित पवारांनी फोन केला असेल तर मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा राजीनामा घेणार का, अंजली दमानियांचा सवाल. 

मी कधीच कुणालाच सोडवण्यासाठी फोन
करत नाही, अंजली दमानियांच्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, तर मी दोषी असल्यास मलाही शिक्षा व्हावी, असंही वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram