Maharashtra SuperFast News : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा पदभार, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी मोदी विराजमान, पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी... 

२४ तास उलटायच्या आत एनडीएत खदखद, कॅबिनेट खातं न मिळाल्याने खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड, शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप

मंत्रिपद वाटपावरून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतूनही नाराजी व्यक्त, अण्णा बनसोडेंकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त
(())

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार

सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, पुणे राष्ट्रवादीनं मंजूर केला ठराव, अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष
((सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणार?))

कोल्हापूरचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मातोश्री निवासस्थानावर दोघांमध्ये चर्चा
((शाहू महाराज छत्रपती 'मातोश्री'वर))

महाडमध्ये आनंदराज आंबेडकरांकडून मनुस्मृतीचं दहन, अभ्यासक्रमात श्लोकांचा समावेश करण्यास तीव्र विरोध 
((आनंदराज आंबेडकरांकडून मनुस्मृतीचं दहन))

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सफर

योगी आदित्यनाथ यांनी घेतली अमित शाहांची भेट, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष चर्चा, राजनाथ सिंह आणि गडकरींची देखील सदीच्छा भेट घेतली 
((दिल्लीत शाह, योगींमध्ये चर्चा))

नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले, दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू, स्थानिकांचा संताप

हिंदी अभिनेत्री नूर मालविका दासची मुंबईच्या लोखंडवाला परिसरात आत्महत्या, टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अस्पष्ट
((अभिनेत्री नूर मालविकाची आत्महत्या))

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola