Maharashtra SuperFast News : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये ६४ मंत्री शपथ घेणार, शपथविधीआधी भावी मंत्र्यांसमोर मोदींनी माडंला १०० दिवसांचा रोडमॅप
राष्ट्रवादीचा एकही खासदार शपथ घेणार नाही, भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मान्य नाही, विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार
अमित शाह, राजनाथ सिंग, पियूष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रिपदाची शपथ, एस जयशंकर यांनाही मंत्रिपदाचा कॉल, तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली
रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण, मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान
नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच, मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित
ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, धनंजय मुंडेंचं नाव न घेता जरांगेंचा इशारा
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजाकडून परळीत बंदची हाक, उद्या वडवणीमध्येही बंदचं आवाहन
राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, सिंधुदुर्गात गेल्या २४ तासात १२१ मिलीमीटर पावसाची नोंद, तर कुडाळमध्येही १५७ मिलीमीटर पावसाची नोंद
मुंबईत मान्सून दाखल तर ११ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार... उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विस्तारणार मान्सून
मुंबई मेट्रो ३ ची आरे ते बीकेसी मार्गीका जुलैपर्यंत सुरू होणार... तर उद्यापासून मेट्रो३ च्या एका लाईनची चाचणी होणार
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, न्यूयॉर्कमधील मैदानावर दोन्ही संघ भिडणार.
सोन्याच्या दरात १,८०० रुपयांची घसरण, गेल्या १२ तासांत दर घसरले, ग्राहकांना मोठा दिलासा.