Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha 

लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   राधाकृष्ण विखे पाटील काय काय म्हणाले? राष्ट्रवादी शरद पवार पक्षात इनकमिंग वाढलं आहे, हा महायुतीला धक्का आहे का? असे राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महायुतीला धक्का वैगरे काही नाही. महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा विचार तर महायुतीला करावाच लागेल. हर्षवर्धन पाटील यांची तशीच अडचण झाली होती. त्यांनी तुतारी हाती घेण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैव आहे. स्वर्गीय शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्या सोबत संघर्ष केला. तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसता हे काही योग्य नाही, असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram