Maharashtra SuperFast News : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णायवर बैठकीत चर्चेची शक्यता
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमताने अनुमोदन, राज्यघटनेला वंदन करत पंतप्रधान मोदींचं इंडिया आघाडीला कृतीतून उत्तर.
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख, थोर नेत्यांच्या परंपरेत बाळासाहेब असल्याचं नमूद
एनडीए हा भारताचा आत्मा, पुढील १० वर्षे देशात एनडीए सरकार, पंतप्रधान मोदींचा विश्वास, तर ईव्हीएमवरुन विरोधकांनाही चिमटे, काँग्रेसला टोले
आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयात मोदींची साथ देणार, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीशकुमार यांचं आश्वासन
शिवसेना भाजप फेविकॉलचा जोड, तुटणार नाही, पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाला मुख्यमंत्री शिंदेंचं अनुमोदन, अजित पवार यांच्याकडूनही समर्थन
नरेंद्र मोदी ९ जूनला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार, भाजप नेते प्रल्हाद जोशी यांची संसदीय पक्षाच्या बैठकीत घोषणा