Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 25 May 2024
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 25 May 2024
विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांची घोषणा, मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब, तर शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर.
ही शिवसैनिकांची शिवसेना, पक्षाची पकड अतिशय घट्ट आहे, विजयी होणार आणि पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार, अनिल परबांना विश्वास.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरे, तर मुंबईसाठी दीपक सावंत यांना संधी मिळण्याची शक्यता, शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरु, दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार.
येत्या सोमवारी एसएससी बोर्डाचा निकाल, २७ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होईल, बोर्डाच्या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला आजपासून सुरुवात, १३ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.
मुंबई महानगर परिसरातील १ हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात, काल पहिल्याच दिवशी तब्बल २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून पहिल्या भागातील अर्ज दाखल, एकूण दोन भागांत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार.
बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार, २७ मे ते ७ जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल, जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा होणार.