Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 01 July 2024 : ABP Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात, फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन.
मंत्री गिरीश महाजनांनी पुण्यात घेतलं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन, यावेळी प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचाही महाजनांनी घेतला आढावा.
आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे लाडू बनवण्यास मंदिर समितीकडून सुरुवात, सुमारे ११ लाख लाडू बनवणार, गरज पडल्यास अधिकचे ५ लाख लाडू बनवण्याचीही तयारी.
विठ्ठल रक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्याचं काम सुरु, या पार्श्वभूमीवर एका अनामिक भक्ताकडून २ कोटींची चांदी अर्पण.
पुण्यात वारकऱ्यांसाठी मेट्रो सफर, तुळशीबाग गणपती मंडळातर्फे सिविलकोट मेट्रो स्टेशन पासून पिंपरी चिंचवडपर्यंत वारकऱ्यांनी घेतला मेट्रोचा आनंद, प्रवासादरम्यान वारकऱ्यांकडून विठूनामाचा गजर.
पुण्यात गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग, महिलेची प्रकृती स्थिर, पुण्यात झिका रुग्णांची संख्या ५वर.