Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर : 01 September 2024

Continues below advertisement

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर : 01 September 2024

मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीचे मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन गेटवे ऑफ इंडिया परिसरातल्या आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी, शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचा आंदोलन, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मारले जोडे.

हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद.

मुंबई पोलिसांची परवानगी झुगारत महाविकास आघाडीचा एलगार, आंदोलनासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. खासदार वर्षा गायकवाड शिवरायांच्या पुतळ्यासह आंदोलनात सहभागी.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचा आंदोलन. महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावर फडणविसांची टीका.

सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला सवाल तर काँग्रेस यावर राजकारण करतय बावनकुळेंचा आरोप.

आंदोलनाला आंदोलनान प्रत्युत्तर. हा भाजपचा मूर्खपणा, संजय रावतांची भाजपच्या आंदोलनावर जोरदार टीका. महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक आयोगाकडन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, साडेन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 86 लाख मतदार तर गडचिरोलीत सर्वात कमी 8 लाख मतदार. जो जागा, जो जिंकेल त्याला ती जागा देण्याबाबत महायुतीच्या.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुनील प्रभू आणि जयंत पाटलांच्या याचिकेवर सुनावणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता सरकार मुदतवाढ देण्या तयारीत असल्याची माहिती

रेशन दुकानातील मोफत तांदूळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, त्याऐवजी आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मिठासह नऊ जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार, लोकांचा आरोग्य आणि आहारातल्या पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ₹9 रुपयांची वाढ, मात्र ही वाढ 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी कर आलेली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram