ABP News

Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी, शिरुरच्या तालुका कोर्टाचा निर्णय
सतीश भोसले हा राजकारणाचा, जातीयवादाचा बळी, खोक्याच्या वकिलांचा आरोप, ढाकणे पितापुत्रांना मारहाणीचा आरोप खोटा असल्याचाही दावा
'माझं काही खरं नाही' म्हणणारे जयंत पाटील शरद पवारांसह एकत्र, बारामती कृषी विज्ञान केंद्रात पाहणी, सुप्रिया सुळेंकडून फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट
राजकीय नेत्यांमध्येही धुळवडीचा उत्साह, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पत्नी आणि मुलीसह धुळवड साजरी...  उपमुख्यमंत्री शिंदेंची मुलगा आणि नातवासह धुळवड... राज ठाकरेही कुटुंबासह रंगात रंगले...
मशिदी झाकून होळी साजरी करण्याची देशावर वेळ आली, संजय राऊतांची टीका, देशभर तणाव पसरवून दंगली घडवण्याचा डाव असल्याचाही आरोप..
जळगावात पाच तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरु अपघातग्रस्त मुंबई-अमरावती एक्स्प्रेस रवाना, खोळंबलेल्या अनेक गाड्याही सुटल्या
गाय आणि म्हशीच्या दूध दरात उद्यापासून दोन रुपयांनी वाढ, गायीचं दूध प्रतिलिटर ५८ रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर ७४ रुपयांवर
अष्टपैलू अक्षर पटेल बनला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, २०१९ पासून अक्षर खेळतोय दिल्लीकडून..के राहुल आणि डुप्लेसिसला मागं टाकत अक्षरनं मारली बाजी..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात शिवसैनिकांसोबत साजरी केली धुळवड, शिंदेंनी आनंद दिघेंच्या फोटोला रंग लावला
ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी होळीचा उत्साह, एकनाथ शिंदेंनी नातवासह साजरा केला धुळवडीचा उत्सव. 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुलगा अमित ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड. 
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून रंगांची उधळण, पारसिकनगरमधे आयोजित करण्यात आलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमात आव्हाड यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. 
आमदार अमोल मिटकरींनी कुटुंबीयांसह साजरी केली धुळवड, अकोल्यातील निवासस्थानी कुटुंबासह केली रंगांची उधळण. 
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी अंधेरी लोखंडवाला साजरी केली धुळवड. आज सर्व तक्रारी विसरून एक नवी सुरुवात केली पाहिजे. संजय निरुपम यांचं विरोधकांना आवाहन.
जालन्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून रंगांची उधळण, कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह साजरा केला धुळवडीचा सण. 
पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अनाथ मुलांसह साजरा केला धुळवडीचा उत्सव, अनाथ मुलांना प्रयागराजला जाता आलं नाही म्हणून कुंभमेळ्यातून आणलेले पाणी वापरून धुळवड साजरी.  
सांगलीत सदाभाऊ खोत यांनी नातवासह साजरी केली धुळवड, खोत हे नातवांना रंग लावताना पाहायला मिळाले.  
शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेसचे खासदार डॉ प्रशांत पडोळेंनी एकत्र साजरी केली धुळवड, नागरिकांनाही दिल्या होळीच्या शुभेच्छा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram