Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर : 30 August 2024

Continues below advertisement

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर : 30 August 2024

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजितदादा आणि शिंदेंनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही माफीनामा...शिवरायांसमोर नतमस्तक होऊन माफी मागतो, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींचं जाहीर वक्तव्य...

पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही, मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया...माफीला उशीर झाल्याची टीका... 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन..२०१९मधील सरकारनं या बंदराला विरोध केला, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी काँग्रेस नेत्यांची धरपकड, वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख यांच्यावर ठेवला पहारा...

बंदराच्या रिक्लेमेन्शनसारखं या ठिकाणी विमानतळासाठीही रिक्लेमन्शन करावं, मुंबईतील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊतांनीही दिली राजकोट किल्ल्याला भेट, महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याची ग्वाही...तर पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप

राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्या नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत.. समितीत इतिहासकार जयसिंगराव पवार विशेष निमंत्रित सदस्य

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram