Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 16 July 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 16 July 2024 : ABP Majha
खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळवरील मशिदीची पाहणी आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती.
पोलिसांनी आडवल्याने सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक, १५ लोकांसह गडावर जाऊ द्या अशी सतेज पाटलांची विनंती केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जाण्यास परवानगी.
विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा, जलील यांचं फेसबूकवरुन कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन.
कॉंग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली, कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करुन कारवाईची अस्लम शेख यांनी केली मागणी.
खासदार शाहू महाराजांना विशाळगड़ावर जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब. ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केली. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया.
विशाळगडावर जाणून-बुजून लोकांना मारहाण आणि दुकान तोडण्यात आली, सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रव्हल्सचा भीषण अपघात, अपघातात ५ वारकऱ्यांचा मृत्यू, तर ८ जण गंभीर जखमी, तर २० ते ३० जणांना किरकोळ दुखापत.
पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात, जखमी वारकऱ्यांवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु, मुख्यमंत्री शिंदे वारकऱ्यांची भेट घेणार.
नागपूर महापालिका हद्दीतील विकासकामांचा फडणवीसांकडून आढावा, झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप तीव्र गतीने करा फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात हव्यात वाढीव जागा, काटोल, हिंगणा, उमरेडसह नागपूरमधील दोन जागांवर पवारांचा दावा.