Sugar Mills Farmer Aid Row | कारखान्यांकडून मदतीवरून राजकारण तापले, Fadnavis-Pawar आमनेसामने
कारखान्यांकडून शेतकऱ्यांसाठी मदत घेण्यावरून मोठे राजकारण पेटले आहे. शरद पवारांनी कारखान्यांकडून मदत घेण्याला विरोध दर्शवला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत घेण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. फडणवीस यांच्या मते, कारखान्यांचे तीस ते पस्तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होतात आणि सरकार त्यांना दहा दहा हजार कोटी रुपये देते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी पाच रुपये बाजूला काढायला सांगितले आहे. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत साखर कारखान्यांना शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख रुपये बाजूला ठेवण्यास सांगितले होते. काही कारखान्यांनी यावर आक्षेप घेतला आणि शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हे पैसे शेतकऱ्यांकडून नव्हे, तर कारखान्यांच्या नफ्यातून अपेक्षित आहेत. ते म्हणाले, "शेतकऱ्याचा काटा मारून या ठिकाणी पैसा जमा करता अन् शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्याठिकाणी देण्याची दानत नाहीये." काही कारखाने शेतकऱ्यांचा काटा मारत असल्याचे त्यांनी सांगितले आणि अशा कारखान्यांना शोधून काढणार असल्याचे म्हटले.