State Cabinet Meeting : अनलॉकबाबत काय निर्णय होणार? राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक
Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या बैठकीत मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन निर्बधांबाबत नवा निर्णय अपेक्षित आहे. याशिवाय मुंबईतील लोकलबाबत सरकार काय निर्णय घेणार याबाबतही उत्सुकता आहे. मुंबई आणि अन्य शहरांतील दुकानं रात्रीपर्यंत आणि शनिवार, रविवारीही सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांचा दबाव आहे. त्यामुळे याबाबतही काय निर्णय होतो याकडे व्यावसायिकांचं लक्ष आहे. राजकीयदृष्ट्याही ही बैठक महत्वाची ठरणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळत ठेवण्याचे आरोप थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरच केल्यानंतर त्याचे पडसाद या या बैठकीत उमटतील अशी शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Maharashtra Unlock Maharashtra Lockdown Coronavirus Maharashtra State Cabinet Meeting