Anand Nirgude Resign : मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने स्वीकारला
Continues below advertisement
राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा देण्यामागे कांही कारणे आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मागास आयोग हा मराठा आयोग झाला आहे अशी टीका सुरू केली होती. त्याचबरोबर ज्या दोन सदस्यांनी राजीनामे दिले त्यांनीही राज्य मागास आयोगाच्या कामकाजामध्ये राज्य सरकारचा सातत्याने हस्तक्षेप आहे असे आरोप केले होते. या दोन कारणामुळे आणि एका पाठोपाठ एक राजीनामे होत असल्यामुळे अध्यक्ष अस्वस्थ होते आणि त्यातूनच हा त्यांनी राजीनामा दिला आहे हा राजीनामा दिल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा उशीर होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Reservation OBC Reservation Anand Nirgude Maharashtra State Backward Commission