Maharashtra Schools : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्य़ांसाठी 'आनंददायी शनिवार' उपक्रम
आतापासून शालेय विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा आनंददायी होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येईल. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असेल. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलंय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य जपलं जाऊन त्यांचा अभ्यासही चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय.