Maharashtra Schools Reopen : 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळेसाठी कोणते नियम असणार? ABP Majha
Continues below advertisement
१ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेबाबतच्या मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता पालक आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती नवीन नियमावलीची... पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत. सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. आता एक डिसेंबरपासून उर्वरित पहिली ते चौथीचे वर्गही भरणार आहेत. शहरी भागात सध्या सातवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत.. त्यामुळं शहरातही एक डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्वच वर्ग सुरु होणार आहेत...
Continues below advertisement