Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लांबणीवर ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, आज (10 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा देखील मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि समृद्धी महामार्गाचं काही पॅकेजेसमध्ये अजूनही अपूर्ण असल्याच्या बाबींचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. मात्र सरकार आणि MSRDC कडून या महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, कधीही तारीख जाहीर होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा देण्यात आलेला तिसराही मुहूर्त पुढे ढकलला जाऊ शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आल्या आल्या 15 ऑगस्ट ही तारीख जवळपास निश्चित झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याबाबतीत आता सरकार नवीन तारीख जाहीर करते किंवा घाईघाईत लवकरच लोकार्पण करत हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram