Voter List Row: सर्वपक्षीय विरोधक नेत्यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद
Continues below advertisement
मतदार याद्यांमधील (Voter Lists) कथित त्रुटींवरून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि इतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) विरोधात रस्त्यावरची लढाई लढली जाईल,' असा थेट इशारा विरोधकांनी दिला आहे. आज दुपारी सेना भवनात (Sena Bhavan) होणाऱ्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. मागील आठवड्यात विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदार याद्यांची नव्याने तपासणी (Summary Revision) करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत मतदार याद्या अद्ययावत होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका (Elections) पुढे ढकलाव्यात, अशी प्रमुख मागणी विरोधकांनी केली आहे. या मागणीकडे आयोग लक्ष देत नसल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement