Prakash Reddy : ‘निवडणुका जिंकण्यासाठी BJP आणि सरकारची Modus Operandi’, कम्युनिस्ट पक्षाचा आरोप
Continues below advertisement
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोटाळ्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षासह (Communist Party of India) महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) याद्यांमध्ये त्रुटी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'भाजप आणि केंद्र व महाराष्ट्र सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी बोगस याद्या तयार करण्याची मोडस ऑपरेंडी (Modus Operandi) अवलंबली आहे', असा थेट आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पत्रकार परिषदेत केला. निवडणूक आयोगाने दिलेला खुलासा खोटा आणि जुजबी असल्याचे सांगत, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने दोनदा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली, पण समाधान झाले नाही. या गैरप्रकाराच्या निषेधार्थ आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी १ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement