Special Report Voter List : बोगस मतदार याद्यांवरून घमासान, विरोधक १ नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार
Continues below advertisement
राज्यातील बोगस मतदार याद्यांच्या (Bogus Voter Lists) मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) संघर्षाची भूमिका घेतली आहे. पुरावे देऊनही आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप करत, येत्या १ नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा विरोधी पक्षांनी केली आहे. 'आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात, तुम्हाला कोणी विचारलंय?' असा थेट सवाल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. सेना भवन (Sena Bhavan) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही नेत्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे, विरोधकांचा हा 'रडीचा डाव' असल्याची टीका भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement