New M-Sand Policy: 'निकृष्ट वाळू बनवल्यास ६ महिने क्रेशर suspend करणार', बावनकुळेंचा इशारा
Continues below advertisement
राज्यात कृत्रिम वाळूच्या (M-Sand) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण निश्चित झाले असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीच्या शासन आदेशाची माहिती दिली आहे. 'जर चुकीची एमसँड बनवली तर सहा महिने क्रेशर सस्पेंड करतील आणि चुकीच्या पद्धतीने विकल्यास बंदी घालू,' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या धोरणानुसार, एमसँड निर्मितीसाठी जिल्हास्तरीय मर्यादा ५० वरून १०० युनिटपर्यंत वाढवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय बांधकामांमध्ये एमसँडचा वापर अनिवार्य केला जाणार आहे. धोरणातील अटींचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल आणि निकृष्ट दर्जाची वाळू बनवल्यास क्रेशर सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल, असेही या निर्णयात स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement