Eknath Shinde Scheme Closed : 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' योजना बंद? शिंदे सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह
Continues below advertisement
राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' ही योजना बंद झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी ही योजना कुठेही राबवली जात नसल्याने, ही योजना बंद झाली आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना बंद झाली आहे की काय?' या प्रश्नामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 'स्वच्छता मॉनिटर', 'एक राज्य एक गणवेश' आणि पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याचे निर्णय मागे घेण्यात आले होते. आता 'आनंद शिधा' योजनेपाठोपाठ आणखी एका महत्त्वाच्या योजनेवर टाच आल्याचे चित्र आहे. राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने ५ डिसेंबर २०२३ रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement