Maharashtra : राज्यात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा बंधनकारक ABP Majha
राज्यात यापुढे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा देणं बंधनकारक असेल. १० लाख रुपये दंड भरून ग्रामीण भागातील सेवा टाळण्याची सवलत आता बंद केली जाणार आहे. आरक्षण आणि शुल्क सवलत मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ग्रामीण भागात सेवा देणं बंधनकारक करण्यात येणार आहे. यावर्षी वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे ग्रामीण भागात सेवा करावी लागणार आहे.