Chandrashekhar Bawankule : माझ्याकडे कुठलीही तक्रार आली नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Continues below advertisement
महार वतन जमिनींच्या (Mahar Vatan lands) व्यवहारांवरून सुरू असलेल्या वादात आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. 'महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत,' असे म्हणत तहसीलदार (Tehsildar) आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) कामकाजाची तपासणी करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत. महार वतन कायदा, १९५८ अंतर्गत, या जमिनींच्या हस्तांतरणावर निर्बंध आहेत आणि त्यांची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि नजराणा रक्कम भरणे आवश्यक असते. या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola