Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोनाचा हाहा:कार; दिवसभरात 57 हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

Continues below advertisement

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील प्रशासनानं अखेर काही कठोर निर्बंधही लागू केले. शिवाय नागरिकांनी या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही शासनाकडून करण्यात येत आहे. 

दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध नव्यानं लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा आरोग्य विभागानं प्रसिद्ध केला. यामध्ये 24 तासात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram