Maharashtra Rains | मुंबई, पुणे, मराठवाड्यात धुमाकूळ, शेतीचं नुकसान, हेलिकॉप्टरने रेस्क्यू
महाराष्ट्राला पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे. मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईमध्ये वरळी, बीकेसी, सायन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. मराठवाडादेखील पावसामध्ये पूर्णतः भिजून गेला. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. अनेक गावांना पुराचा विळखा पडला. पुरात अडकलेल्यांचा हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू करण्यात आला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.